..... आखाजी .....


अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी त्रेतायुगात वर्षना पहिला दिवस.

अहिराणी संस्कृतीमजार नवीन वर्षनी कालगणना आखाजीपासूनच सुरु व्हस खान्देशात या दिवस शेतकरी नवीन सालदारले साल वर ठेवतसं सासुरवाशीण बाया या दिवस माहेरले येतीस ,पोरी आणि बाया झोका खावाना मनमुराद आनंद लुटतीस पोरीस्ना गवराईना उत्सव ऱ्हास,  पितरस्ले "घास" टाकाना दिवस म्हणून भी आखाजीले महत्त्व शे.

घास टाकन म्हणजे ज्यास्ना कधीच नास व्हनार नही अशा स्वर्गातला वाडवडिलस्ना म्हणजे पितरस्ना अक्षय आशिर्वाद घेवान आणि त्यास्ना नावधरी घागर पुजानं ही परंपरा अहिराणी संस्कृतीमा शे.

आखाजी हा सण अहिराणी संस्कृतीना प्रमुख सण शे साडेतीन मुहूर्तसं पैकी अर्धा मुहूर्त म्हणजे आखाजी अशी धार्मिक परपंरास्नी आखाजीले मान्यता दियेल शे
आखाजीन आणखीन महत्त्व म्हणजे "गवराई"
गवराई ही धान्यनी देवता शे धनधान्य पिकाडानी शक्ती ही गवराई जवळ ऱ्हास म्हणून तिना आजुबाजुले धान्य पैरतसं इतकसं काय फुलस्न्या आणि धान्यन्या माळा गवराईले घालतस्ं 

आखाजीले शिवकथानी परंपरा शे हिमराजा पार्वतीले म्हणजे आपली आंडेरले या दिवस माहेरले आणसं जाताना नागोजी सुतारकडे दोन घोडास्ना लाकडी रथ घडाई घेस म्हणजेच गवराई बनाडी घेस

गवराई ही कृषी संस्कृतीनी दैवत आणि प्रतिक शे ,
आखाजीनं प्रसिद्ध गाणं बापलेकीनं प्रेम दर्शवसं

आथा आंबा तथा आंबा कैरी झोका खायं व
कैरी तुटनी खडक फुटना पानी झुळझुळ व्हायं व
पानी झुळझुळ व्हायं तठे रतन धोबी धोनं धुय व
 रतन धोबी धोयं तठे कसाना बजार व
रतन धोबी धोयं तठे तोडास्ना बजार व
माय माले तोडा ली ठेववं बंधूना हाते धाडी दे वं

या गाणानां प्रतिभाशाली अशिक्षीत मायमाउलीनी माले अर्थ सांगा  'आंबा बाप कैरी आंबानी आंडेर सासरे जास म्हणजे कैरी तुटनी. बापपशीन दूर जास. खडकनसारखं बापनं अंतरंग म्हणजे खडक फुटजा ,बापना ह्रदयले मयाना पाझर फुटना. मंग आंडेर बापकडतीन दागिनास्नी अपेक्षा करसं 'सरस्वतीनं चिरंजीव वरदान मिळेल त्या  मायमाउलीन्या हुशारीनं माले आश्चर्य वाटसं
 आखाजीना दिवस गवराई जागरणले पोरी गाणां म्हणतीसं 

ऊच्चा आंबा ढग पातळा कैरी हिंदळा खाय वं! कैरी तुटी खडक फुटा झुळ झुळ पाणी वाह्यं वं!! झुळ झुळ पाणी वाह्यं तठे रत्तन धोबी धोयं वं! रत्तन धोबी धोयं तठे गौराई रंभा न्हायं वं!! न्हाई धुई थडीवर उभी आवढा शिणगार खायं वं!!


इठली गलीले उनात वांगा
शेरभर तुम्ही लितिस का
दामू पाटीलले दोन बायका
तिसरी तुम्ही व्हतीस काय

गवराई नवसनी देवता नही तर निर्मळ आनंद देणारी उत्सवदेवता शे हा सण खान्देशनी सुजाण संस्कृतीनं प्रतीक शे माहेरवाशीणना सोनाना दिवस शे  तिले आखाजीना दिवस माहेरवाशीणले माहेर येणच पडस हा आखाजीना रिवाज शे.

----- तुषार आहेर